रविवार, ११ एप्रिल, २०२१

पैस-अवकाश अभिव्यक्तीचं!

पैस-अवकाश अभिव्यक्तीचं!



पावसाळा सुरू झाला की पावशा 'पेरते व्हा' म्हणत शेतकऱ्यांना साद घालतो, त्यांना लावणी करायची आठवण करून देतो. मलाही एक पावशा कधीचा 'लिहिते व्हा...' साद देत होता. अनेक वर्षं लिहिण्याची कला आपल्यात आहे की नाही हा विचार करण्यात घालवली; पण मग लिखाणाला सुरुवात केल्यावर कळत गेलं की लहानपणापासून जे वाचलं, जे अनुभवलं ते लिहून काढण्यात एक वेगळाच आनंद असतो आणि वाचकांपर्यंत ते पोहोचवण्यातही! म्हणूनच एकदाचा हा ब्लॉग सुरू केला आहे. 

ब्लॉगचं नाव थोडं अवघड वाटलं असेल तुम्हाला; पण माझं आराध्यदैवत दुर्गाबाई भागवतांच्या आठवणीसाठी हे नाव ठेवलं आहे. या शब्दाशी माझी ओळख त्यांनीच करून दिली. 'पैस - अवकाश'. किती सुंदर शब्द आहे हा! हा ब्लॉग म्हणजे माझ्या विचारांना अभिव्यक्त करणारं अवकाश आहे. याातून तुमच्यापर्यंत माझे विचार, अनुभव पोहोचवणार आहे. 
चला तर मग हा नवीन प्रवास मिळून सुरू करू या. मला लिहिण्यासाठी एका धक्क्याची गरज असते. हा ब्लॉग तो धक्का ठरेल, असं म्हणूया. 

©तृप्ती अ. कुलकर्णी



२१ टिप्पण्या:

  1. अभिनंदन...
    आम्हालाही वाचायला एक धक्क्याची गरज भासते सो्ॆम्य का होईना
    तुझा उपक्रम हा तो धक्का ठरो.
    Congrats and best luck....Samir

    उत्तर द्याहटवा
  2. Congratulations Trupti. तुझे लिखाण मला खूप आवडते. भरपूर लिही. अनेक शुभेच्छा.🙂👍

    उत्तर द्याहटवा
  3. अभिनंदन... खूप आनंद झाला.
    नक्की follow Karen मी.
    नवीन उपक्रमासाठी All The Best

    Kiran

    उत्तर द्याहटवा
  4. तृप्ती फारच छान उपक्रम आहे 👏👏👏तुला जसा तुझा "पावशा" भेटला तसाच तो ज्याचा त्याचा त्याला भेटायला हवा!

    उत्तर द्याहटवा
  5. अभिनंदन व उपक्रमाला अनेक शुभेच्छा 💐

    उत्तर द्याहटवा